.

सर्व तंत्रस्नेही मित्रांचे ज्ञान संस्कार च्या साईट वर हार्दिक स्वागत...सुस्वागतम... सुस्वागतम... सुस्वागतम...कॉम्प्युटर तंत्रज्ञानात आपण पारंगत व्हावं हा ज्ञान संस्कार चा मुख्य उद्धेश आहे, कॉम्पुटरशी संबंधित तंत्र आपण आत्मसात करावीत हा ज्ञान संस्कारचा हेतू आहे. आजच्या काळात या कौशल्यांची खरोखर गरज आहे.

गुरुवार, २८ ऑक्टोबर, २०२१

राज्यातील शाळांना दिवाळी सुट्टी

शासन परिपत्रक:

कोव्हीड-१९ प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील शाळा दिनांक ०४/१०/२०२१ पासून ऑफलाईन स्वरूपात सुरू झाल्या आहेत. राज्यातील इयत्ता १ ली ते १२ वी च्या शाळांना विविध धार्मिक सण / उत्सवांकरीता सुट्ट्या घोषित करण्यात येत असतात.

२. सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षामध्ये दिवाळी सणाच्या अनुषंगाने राज्यातील शाळांना दिनांक २८ ऑक्टोबर २०२१ ते दिनांक १० नोव्हेंवर २०२१ या कालावधीत सुट्टी घोषित करण्यात येत आहे. या कालावधीत शाळांमार्फत घेण्यात येणारे ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने सुरू असलेले अध्यापनाचे कामकाज बंद राहील.

३. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२११०२७१३०४५३२०२१ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.